बोगस पत्रकारांवर होणार कारवाई नोंदणीकृत वृत्तपत्र-माध्यमांच्या पत्रकारांना

ओळखपत्र देणार : दुचाकींवर प्रेस म्हणून मिरविणाऱयांवर कठोर कारवाई होणार
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
बोगस पत्रकारांमुळे अधिकारी तसेच पीडीओ त्रासले आहेत. त्यामुळे आता नोंदणीकृत वृत्तपत्र व
माध्यमांच्या पत्रकारांनाच ओळखपत्रे देण्यात येणार
आहेत. कोणत्याही विनापरवाना वृत्तपत्र किंवा यु-ट्यूब वेबसाईटमध्ये काम करणाऱया कोणत्याही पत्रकाराला ओळखपत्र दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी
नितेश पाटील यांनी स्पष्ट केले. बोगस पत्रकारांच्या
सुळसुळाटामुळे हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांची बैठक घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या पत्रकार म्हणून अनेक जण वावरत आहेत. एखादी वेबसाईट, पोर्टल यु-ट्यूबवर चॅनेल काढायचे आणि पत्रकार म्हणून सांगून अधिकाऱयांना ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. याचबरोबर वर्षातून केवळ एकदा किंवा दोनवेळा वृत्तपत्र छपाई करायचे आणि त्याचे मोजक्मयाच लोकांना वितरण करायचे. ‘मी संपादक आणि पत्रकार आहे’ असे सांगून अधिकाऱयांवर दबाव घालण्याचे व पैसे वसूल करण्याचे प्रयत्न केले जातात, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता जे बोगस पत्रकार आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱयांनी बैठक घेतली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पत्रकारांनी येणाऱया अडचणींची माहिती दिली. काही ग्राम पंचायत पीडीओंना पत्रकार आहे म्हणून धमकी देऊन त्यांच्याकडून रक्कम उकळल्याचे प्रकार घडले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. पत्रकार बोगस असो किंवा सध्या कार्यरत असलेला असो, कोणीही पैसे किंवा इतर काही वस्तूंची मागणी केल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, असेदेखील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱयांना ठासून सांगितले.जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी नोंदणीकृत वृत्तपत्रांची नावे वाचून दाखविली. त्यामुळे जे वर्षातून एकदा किंवा दोनवेळा वृत्तपत्रे छपाई करून वाटप करतात त्यांचे धाबे दणाणले होते. काही जणांनी अर्ज केले आहेत. मात्र आम्हाला अद्याप रितसर परवानगी दिली नाही. मात्र येत्या 15 दिवसांत सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावेत. संबंधित समितीमध्ये त्यावर चर्चा करून अर्ज निकालात काढले जातील, असेही सांगण्यात आले. नोंदणीकृत वृत्तपत्र व माध्यमांच्या पत्रकारांना 15 दिवसांत ओळखपत्रे दिली जातील, असे स्पष्ट केले. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी.बोरलिंगय्या यांनीही विचार व्यक्त केले. माहिती
खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी
उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
बैठकीला राजशेखर पाटील, महाबूब मकानदार, राजू गवळी, चंद्रू श्रीरामलू, सहदेव माने, कीर्ती कासरगोड,महांतेश कुरबेट, श्रीशैल मठद, संतोष श्रीरामलू,राजशेखर हिरेमठ, जगदीश विरक्तमठ, मंजुनाथ
पाटील, श्रीधर कोटारगस्ती, सुनील पाटील, सुबानी
मुल्ला, एकनाथ अक्षीमनी, सुनीता देसाई, इमाम हुसेन,विश्वनाथ देसाई, विजय मोहिते यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार, कॅमेरामन व फोटोग्राफर्स उपस्थित होते.
पत्रकारांनी सहकार्य करावे
वाहनांवर प्रेस म्हणून लिहिले गेले आहे. प्रिंटिंग
प्रेसमध्ये काम करणारे तसेच कपडय़ांना इस्त्राr करून देणारेदेखील दुचाकी व चारचाकींवर प्रेस म्हणून लिहितात. मात्र आता यापुढे काटेकोर तपासणी केली जाईल. जे खरोखर पत्रकार आहेत,ज्यांच्याकडे
ओळखपत्र आहे त्यांनाच ही मुभा दिली जाणार आहे.तेव्हा सर्व पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले.