जंगल भागातील शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

(काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा ; पक्षाने दिलेल्या उमेदवारासोबत एक मताने राहण्याचा निर्णय)
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड :तालुक्यातील अतिदुर्गम ‘बंदीभाग’ म्हणून ओळख असलेल्या , जंगलव्याप्त भागात गत आठवड्यात अतिवृष्टीने लोंकाच्या घरात व शेतात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावर सत्ताधारी भाजपने अनास्था दर्शवित अतिवृष्टीने बेहाल झालेल्या गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उमरखेड येथे आयोजित ‘दहीहांडी’ कार्यक्रमात नर्तकींचा कार्यक्रम घेऊन आपद्ग्रस्तांच्या जखमेवर मिठ चोळल्याचा राग व्यक्त करून बंदी भागातील शेकडो युवकांनी कॉग्रेसच्या धेय्यधोरण व पक्षनेतृत्वावर विश्वास दर्शवित, दि . 10 सप्टेंबर रोजी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस कार्यालयात झालेल्या काँग्रेस प्रवेश सोहळ्यात प्रवेश घेतला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे .
गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतिदुर्गम भागातील अनेक गावात , नदी नाल्यांचे पाणी लोकांच्या घरात व शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील जनता अतिवृष्टीचा सामना करीत आसतांनाच, भाजपने घेतलेली 'दहीहंडी' यामुळे जनतेने चांगलाच रोष व्यक्त केला होता. मात्र या बद्दल सत्ताधाऱ्यांची जंगल भागातील पूरबाधित शेतकरी व सामान्यांप्रती अनास्था दर्शविली. त्याच पार्श्वभूमीवर, जंगल भागातील खरबी , दराटी , कोरटा , शिवाजी नगर, वालतुर , सोईट घडोळी , नारळी व बिटरगाव या गावातील 337 युवक व नागरिकांनी काँग्रेसच्या धेय्यधोरण व नेतृत्वावर विश्वास दाखवत प्रवेश घेतला.
यावेळी शहर काँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेश सरचिटनिस तातुजी देशमुख , माजी जि.प बांधकाम सभापती राम देवसरकर , अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र कावळे, तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे , यूवा नेते गोपाल अग्रवाल जि प चे माजी सभापती दादाराव गव्हाळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या शेकडो जणांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी पक्षाकडून इच्छुक असलेले साहेबराव कांबळे, मीनाक्षी सावळ्कर, किशोर भवरे, पुजा अंबादास धुळे , आनंदराव पोपुलवाड , प्रकाश वाघमारे , दिपक कांबळे , नथ्थुजी लांडगे , प्रमोदिनी रामटेके , रंजना लांबटिळे, सदाशिव वाठोरे , भैया पवार आदिंची उपस्थिती होती . यावेळी भगवान देवसरकर , विलास पेंदे ,हनुमंत पिलवंड ,मोहन कोंडेवाड ,पी .सी . भोळे ,कयाम नवाब,बंटी पठाण , भोला राठोड, ईश्वर गोस्वामी उपस्थित होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाच्याच्या मागे ताकदीने उभे राहणार असल्याची ग्वाही इच्छुकांनसहित प्रवेशकर्त्यांनी पक्षनेत्यांना दिली .