भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने महागाव येथे आढावा बैठक संपन्न

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
काल शासकीय विश्रामगृह महागाव येथे भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड च्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली यात प्रामुख्याने फाउंडेशनचे जिल्हा तालुका व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाविक भगत यांचे महागाव येथे बस स्टॉप परिसरात आगमन होताच पदाधिकार्यांनी फटाके फोडत त्यांचे स्वागत केले त्यानंतर भाविक भगत यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर संत नरहरी सोनार संत सेवालाल महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.

या बैठकीत फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला तसेच गावातील समस्या नवयुवकांच्या हाथाला रोजगार महिला सक्षमीकरण महिला सुरक्षा आरोग्य क्षेत्रातील समस्या यावर चर्चा करण्यात आली महागाव तालुक्यातील जवळपास 80 टक्के गावातील पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते यात भाविक भगत यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच या बैठकीत महागाव तालुक्याचा मतदारसंघ आढावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाविक भगत यांच्यापुढे मांडला.
सदर आढावा बैठक हि संस्थापक अध्यक्ष भाविक भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीचे यशस्वी नियोजन फाउंडेशन चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केले.