विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा – अँड संतोष जैन

( युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलचे
स्नेहसंमेलन चे उद्घाटन संपन्न )
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
सद्यस्थितीत रामराज्य खरंच असेल तर आजच्या पीढीत आहे विद्यार्थी हे नशीबवान असून त्यांच्यासाठी अनेक शैक्षणिक सुविधा तयार झाल्या आहेत असे असताना मोबाईलचा वापर हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत त्यामुळे पालकांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा अनावश्यक होणारा मोबाईलचा वापर टाळावा असे आवाहन युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष तथा ज्येष्ठविधीज्ञ संतोष जैन यांनी केले ते युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलन समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी मंचावर नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर , गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड, स्कूलचे संचालक कमल माहेश्वरी , भगवान अग्रवाल, संतोष माहेश्वरी , सुभाषराव दिवेकर ,सतीश जैन ,प्रतिष्ठित व्यापारी विजय जैन , मुख्याध्यापिका सौ मनीषा फुलेवार ,सौ विजया ठाकरे ,ज्योती तीवरंकर , दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष निळकंठ धोबे मंचावर उपस्थित होते . यावेळी बोलताना संतोष जैन यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण देण्याची काळाची गरज आहे तर आपल्या उद्घाटन भाषणातून मुख्याधिकारी मनीष जामनेर यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला समोर जात असताना विद्यार्थी दशेमध्येच काय तयारी करायची याबाबत मार्गदर्शन दिले तर गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थी आपले ज्ञान विकसित केल्यास यश हमखास प्राप्त होते असे सांगितले उद्घाटन समारोह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शितल जाधव व शितल जोशी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ विजया ठाकरे यांनी मानले