Uncategorized

भाऊसाहेब माने जिनिंग प्रेसिंग संस्था रेशीम सूतगिरणी उभारणार

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

सततची नापिकी शेतातील वाढता उत्पादन खर्च व वातावरणातील बदलामुळे निसर्गातील अनियमिता त्यातच शेतकरी एकच पीक वारंवार घेत असून पिकांची फेर पालट होत नसल्यामुळे उत्पादकता कमी आहे त्यातच बाजार भाव कमी जास्त असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ढासाळताना दिसत आहे. शेतकऱ्यांचा हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना समृद्ध व सक्षम करण्याच्या उदात्त हेतूने सहकारमहर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना तुती हे पर्याय पीक देऊन रेशीम प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासंबंधीचे उद्दिष्ट उपविधी मध्ये दुरुस्ती करून संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळांनी रेशीम प्रक्रिया मसुदा व धोरण ठरवण्यासाठी दि 28 रोजी येथील नगरपरिषद वाचनालय सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते .
या सभेचे अध्यक्ष शिवाजीराव भाऊसाहेब माने हे होते तर प्रमुख पाहुणे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष निलेश हेलोंडे, आमदार नामदेवराव ससाने,भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, रेशीम संचालनालय नागपूर चे उपसंचालक महेंद्र ढवळे, रेशीम तज्ञ व भूतपूर्व रेशीम संचालक डॉ लक्ष्मीकांत कलंत्री,अमरावती रेशीम विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत लाडगावकर, शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने , जिल्हा रेशीम अधिकारी विलास शिंदे , प्रकाश चलपलेवार,


नितीन माहेश्वरी याची उपस्थिती होती या परिषदेचे प्रस्तावितेत डॉ . विजयराव माने यांनी बोलताना स्व . वसंतराव नाईक , जेठमलजी माहेश्वरी , जीन प्रेसचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब माने यांनी तालुक्यातील शेतकऱ्याचा आर्थिक विकास व्हावा या उदात्त हेतूने कापसावर प्रक्रिया करण्याच्या उद्दिष्टाने आपला जीन प्रेस ची स्थापना केली होती .
सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस पीक खर्चिक झाल्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला पण सतत तेच तेच पीक घेतल्यामुळे सोयाबीनचे उत्पादनही कमी होत चालले आहे याला चांगला पर्याय म्हणून तुती पिकाकडे शेतकऱ्यांनी वळून रेशीम शेती करावी शेतकऱ्यांच्या रेशीम कोषाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या वतीने रेशीम सुतगिरणी उभारण्यासाठी धोरण ठरवणे आवश्यक असल्यामुळे रेशीम परिषदेचे आयोजन करण्यात आले या सभेत संस्थेस रेशीम कोष प्रक्रिया उद्योग उभारणी करिता पायाभूत सुविधा, लागणारे मनुष्यबळ तांत्रिक सहाय्य, जागा, भांडवली गुंतवणूक, शासनाकडून मिळणारे अनुदान व इतर स्त्रोत यांच्याकडून मिळणारे अर्थसहाय तसेच या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, तालुक्यात असलेली तुती लागवड आजूबाजूच्या तालुक्यातून अंदाजित मिळणारे कोष इतर खर्च आणि मिळणारा निव्वळ नफा यावर सखोल चर्चा करून रेशीम सुतगिरणी उभारण्यासाठी संस्था सक्षम असल्याचे मत प्रास्ताविकातून डॉ .विजयराव माने यांनी मांडले,
तसेच डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री ,महेश ढवळे उपसंचालक , हेमंत लाडगावकर यांनी कॉलिटी कोषापासून उच्च प्रतीचा रेशीम धागा मिळतो ए आर एम, आणि एम आर एम मशीनची माहीती सांगितली व शेतकऱ्यांचा रेशीम प्रक्रिया उद्योग संधर्भात आत्मविश्वास वाढेल या उद्देशाने तंत्रज्ञान समजाऊन सांगितले, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी रेशीम उद्योग उपक्रमाचे स्वागत करीत जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीला लागणारे शासकीय आर्थिक मदतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली .
या कार्यक्रमाला संस्थेचे मानद सचिव चितांगराव कदम, संस्थेचे संचालक अवधूतराव देवसरकर, संजय माने, उद्धव गायकवाड, कपिल चव्हाण, संजय कदम, अरविंद भोयर, सतीश नाईक, अतुल पाटील, अँड.संतोष जैन,डॉ . वि .ना .कदम, तहसीलदार आर व्ही . सुरडकर, रमेश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर , प्रशांत पत्तेवार, अशोक वानखेडे आणि रेशीम व दुग्ध व्यवसाय करणारे प्रगतशील शेतकरी उपस्थित होते या सभेचे संचलन व्यवस्थापक जोशी यांनी केले तर आभार उद्धव गायकवाड यांनी मांडले

चौकट :

रेशीम प्रक्रिया उद्योगात रेशीम धाग्या सोबतच मृतरेशीम अळ्यांचे मूल्यवर्धन करून औषधी गुणधर्म असनारे प्रथिनांचे बायप्रॉडक्ट उत्पादन शक्य.

डॉ. विजय माने
सहयोगी अधिष्ठाता,
शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ.

  • कोट –
    रेशीम सूतगिरणी ला सक्षम करण्यासाठी कर्ज न घेता इतर सहकारी संस्थांना व फार्मर्स प्रोडूवसर कंपनीला हिस्सा देऊन भांडवल उभे करावे तसेच नियोजित रेशीम सुतगिरणीला संस्थेने स्व . जेठमलजी माहेश्वरी यांचे नांव देण्यात यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!