पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत बोथा गौळ मुळावा मटका व जुगार धंदा जोमात सुरू पोलीस अधीक्षक कारवाई करतील का? भाग(2)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत बोथा येथ टेकडी जवळ शेड करून पत्त्याचा क्लब खुलेआम सुरू केला आहे पुसद व बाहेरगाव येथील व परिसरातील आंबट शौकीन मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे पंधरा दिवसापासून पत्त्याच्या डावावर परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हरत आहे. आता पेरणीचे दिवस असताना अवैध धंद्यांन उतमात केलेला आहे एलसीबी पथक पुसद व डी वाय एस पी उंबरखेड यांना हप्ते देऊन ठाणेदार व बीड जमदार यांच्या आशीर्वादाने गौळ येथे मटका व बोथा येथ अवैद्य सोशल पत्त्याचा क्लब वाले हप्ते दिल्याचे बोलून दाखवत आहेत .तसेच मुळावा येथे मटक्याची दुकान लागलेले पहायला मिळत आहे.मटक्याच्या दुकानावर परिसरातील लोकांनी गर्दी करून खुलेआम मटका शौकीन मटका लावताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बोथा येथील पत्त्याचा क्लब, गौळ येथील मटका ,व मुळावा येथील खुलेआम सुरू असलेला मटका , परिसरातील अवैध धंदे पोलीस अधीक्षक कारवाई करतील का ?हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.