Uncategorized

धारधार शस्त्र बाळगणाऱ्या इसमास केले जेरबंद स्थानिक गुन्हेशाखे ची कारवाई

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

पुसद – पोलीस स्टेशन वसंतनगर हददीतील पार्वतीनगर येथील धारधार शस्त्र बागळणा-या एका इसमाला शस्त्रासह ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने केली आहे
यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच उघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध शस्त्र, अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या असता


दिनांक 20/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन वसंतनगर हददीत मौजे पार्वती नगर येथील इसम नामे शेख सददाम शेख पाशा, हा त्याचे स्वतःचे ताब्यात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दुखलपात्र गुन्हा करण्याचे अनुशंघाने लोखंडी धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्याचे जवळ एक टोकदार धारधार स्टीलची लोखंडी धातूची तलवार किमत 2000 रु. मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-शेख सददाम शेख पाशा वय 23 वर्ष, रा.पार्वती नगर ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या विरुध्द वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिता , मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री. पंकज अतुलकर , मा.पोलीस निरीक्षक श्री, ज्ञानोबा देवकते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!