Uncategorized

उत्तर भारतीय संघ आयोजित स्त्री शक्ति सन्मान सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

मुंबई दि.१७ : आमच्या शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणीच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

उत्तर भारतीय संघ द्वारा आयोजित रक्षाबंधन निमित्ताने स्त्री शक्ति सम्मान सोहळा आणि पाच हजार बहीणीना साड्या भेट देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.त्यावेळी श्री.शिंदे बोलत होते.यावेळी आमदार प्रताप सरनाईक,उत्तर भारतीय संघाचे संतोष आरएन सिंह , उत्तर भारतीय संघाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी श्री.शिंदे म्हणाले,महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.महाराष्ट् अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत.सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील.अयोध्या हे आपल्या सर्वांसाठी पवित्र स्थळ आहे तेथे आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे.उतर भारतीय संघाने महिला भगिनी साठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे.तसेच येथील महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फाॅर्म भरला नसेल तर ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व भगिनींनी अर्ज भरावा असे आवाहन ही श्री.शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उत्तर भारतीय महिला भगिनींना साड्या वाटप करण्यात आले. महिला भगिनींनी मुख्यमंत्री महोदयांना राखी बांधली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!