Uncategorized

33 के. व्ही. लाईनची तार घरावर लोंबकळली

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

गुंज ते मुडाना दरम्यान नव्याने टाकण्यात आलेल्या ३३ के.व्ही. वीजवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच सवना येथील याटेवाड कुटुंबीयांवर गंभीर संकट ओढावले आहे. त्यांच्या घरावरून वीजवाहिनीची तार लोंबकळत असल्याने जीवाला धोका निर्माण झाला असून, विद्युत वितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

सवना येथील सोनबा गिरधारी याटेवाड यांच्या घराजवळून ३३ के. व्ही. लाईन जात असून, ती त्यांच्या लोखंडी पत्र्याच्या घरावरून अगदी खाली लटकत आहे. यामुळे केव्हाही करंट प्रवाह होऊन मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात ते स्वतः राहतात तसेच शेकडो शेळ्या-मेंढ्याही आहेत. अशा

परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. याटेवाड यांनी महागाव येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्यांना याबाबत लेखी निवेदन सादर करून धोका दर करण्याची विनंती केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत संबंधित तार हटविण्याचे वा उंचावण्याचे कोणतेही कार्य झालेले नाही. “घरावरूनच ३३ के. व्ही. लाईन लोंबकळत असल्याने झोपताना धास्ती वाटते. वीज वितरण कंपनीने तातडीने पावले उचलून ही समस्या दुर करावी,” अशी मागणी याटेवाड कुटुंबीयांनी वीज वितरण कंपनी शाखा अभियंता यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!