शहर

अण्णाभाऊ साठे जयंती व मनोज जरांगे पाटील वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

ढाणकीतील मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालयात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षण आणि समाजसेवेचा अनोखा संगम

सहसंपादक शेख मुजाहिद

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालय, ढाणकी येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. यानंतर मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन व खाऊचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधानाने कार्यक्रमाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरोजताई देशमुख होत्या. यावेळी दिनेश पाटील रावते, विजयभाऊ हडपकर (नगरसेवक, उमरखेड), स्वप्नील पाटील कनवाळे, ठाकरे काका, विशाल नरवाडे, चांदराव सुरोशे, धोपटे भाऊ, सुनील पाटील, कदम सर, पवार सर, शुभम माने तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रावते सर, सहशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक संदेश
संविधानाने प्रत्येक बालकाला समान शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून संवेदनशील लोकशाहीचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

“गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच खरी समाजसेवा,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button