अवैधरीत्या होणाऱ्या रेती उपशावर महसूल प्रशासन मेहरबान!

महसूल विभागातील कर्मचारी रेती तस्करी चा मोहरक्या
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
शासनाकडून रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे चोरट्या मार्गाने तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रासह ठिक ठिकाणच्या नाल्यावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे याबाबतीत महसूल प्रशासनाकडे उमरखेड तालुक्यातील कोणत्या रेतीघाटावरून किती वाहने रेती तस्करी करीत आहेत याची खडा न खडा माहिती असून देखील महसूलप्रशासन या बाबीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप आता जनसामान्यातून होऊ लागला आहे तालुक्यातील तिवडी माणकेश्वर बोरी चालगणी साखरा खरुस यासह विविध ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केल्या जात असून या रेती तस्करी ला ममूल जगातील काही कर्मचारी आपले वर कमाईचे साधन समजून रेती तस्करीला पाठबळ देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होऊ लागला आहे याबाबतीत मुळावा परिसरातील जागरूक नागरिकांनीमहसूल प्रशासनाकडून अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वर कार्यवाही होत नसल्याचे पाहून नागरिकांनीच अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून याबाबतीत महसूल प्रशासनाला सूचना करून ते वाहन महसूल प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले मुळाव्याप्रमाणे पैनगंगा नदी काठावरील इतरही गावात बेसुमार पणे अवैधरीत्या रेतीचे उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे या रेती तस्करीच्या अवैध धंद्यात महसूल प्रशासनातीलमहसूल चे कर्मचारी पोलिसांना सोबत का घेत नाहीत?अवैधरित्या होणाऱ्या रेती तस्करीला आळा बसावा म्हणून शासनाकडून महसूल कर्मचाऱ्यांच्या दिमतीला पोलिसांचा फौज फाटा घेऊन जाण्यास परवानगी दिली असताना देखील महसुलातील कर्मचारी पोलिसांचा फौज फाटा घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे रेती तस्करावर नुसत्या महसूल कर्मचाऱ्यांचा धाक पडत नसल्यामुळे महसुलातील कर्मचाऱ्यावर रेती तस्करांकडून हल्ले केल्या जात असल्याच्या घटना मागील काही दिवसापासून घडत असल्याचे दिसत आहे एवढे सारे होत असताना देखील महसुलातील कर्मचारी रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांना सोबत घेऊन जाण्याचे का टाळत आहेत असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे.विशिष्ट कर्मचारी काही राजकीय लोकांच्या मर्जीतील तस्करांना हाताशी धरून संबंध तालुका भर अवैध रेती तस्करीचे नेटवर्क चालवीत असल्याचा गंभीर आरोप सामान्य नागरिकांतून केला जात असला तरीही महसुलातील वरिष्ठ अधिकारी या रेती तस्करीत मास्टर माईंड असलेल्या त्या कर्मचाऱ्यावर मेहरबान असल्यामुळे रेती तस्करीवर म्हणावी त्या प्रमाणात कार्यवाही केल्या जात नसल्याची ओरड नागरिकांतून होत असल्याचे दिसत आहे.



