मी पाहिलेला माणसातला देव

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भाविक भाऊ भगत लोकांचे दुख हे जणू आपलेच दुःख आहे ओळख असो वा नसो लहान मोठा पक्षपात न करता रात्रंदिवस लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे भाविक भाऊ भगत कुठल्याही भागातून पेशंट यवतमाळला पाठवला की सगळी चिंता दूर होते राहण्याचा खाण्याचा प्रश्नच नाहीसा होतो पुढे काय होईल कोण मदत करेल हे सगळे विचार नाहीसे होतात मनात एक आशेचा किरण निर्माण होतो जणू काही हिंमत मिळते ती हिंमत म्हणजे भाविक भाऊ भगत,
निस्वार्थ सेवा करणारा व्यक्ती आजपर्यंत मी पाहिला नाही रात्री अपरात्री कधी फोन केला तर नेहमी हसून व प्रेमाने बोलणारे सगळी समस्या व्यथा ऐकून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाविक भगत .
भाऊ तुमच्या जागी दुसरा कोणता व्यक्ती असता तर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली असती राग केला असता काय पेशंट समस्या सांगत आहे असे फटकारले असते परंतु भाऊ आपण मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे एक व्यक्तिमत्व आहात तुम्ही. भाऊ तुम्हाला बघून एक काम करण्याची जिद्द उत्साह आणि प्रोत्साहन मिळते तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी आपण भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडची स्थापना केली फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवा रुग्णसेवा आज सर्व गावात होत आहे भाऊ तुमच्या कार्याला आणि जिद्दीला माझा सलाम राजकारण न करता समाजकारण लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे लोक फार कमी या काळात तर बोटावर मोजणे इतकेच आहेत यात भाऊ तुम्ही येतात ते पण सर्वोच्च स्थानी पुन्हा एकदा सलाम भाऊ तुमच्या कार्याला आणि जिद्दीला.
अनुप शेखावत
जिल्हाध्यक्ष
भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड यवतमाळ