Uncategorized

आजाद समाज पार्टीची उमरखेड तालुका व ग्रामीण कार्यकारिणी जाहीर

(तालुक्यातील अनेक गावातील तरुणांचा पक्ष प्रवेश)

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. २६ जुलै) आंबेडकरी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले भीम आर्मी प्रमुख तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ऍड चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील तरुणांनी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 24 जून रोजी संपन्न झालेल्या बैठकीत पक्षप्रवेश घेतला.

आजाद समाज पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे जिल्हा सचिव आत्माराम आडे यांच्या उपस्थितीत उमरखेड तालुका, उमरखेड शहर, व ढाणकी शहर खरुस कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

आजाद समाज पार्टी उमरखेड तालुका अध्यक्षपदी देवानंद पाईकराव, विष्णुकांत वाडेकर युवा तालुकाध्यक्ष,सचिन वाहुळे तालुका महासचिव,
प्रफुल दिवेकर उमरखेड शहर अध्यक्ष, काशिनाथ उर्फ गोलू मुनेश्वर ढाणकी शहराध्यक्ष, समाधान राऊत महासचिव, उपाध्यक्ष धम्मपाल गायकवाड, हर्षदीप काळबांडे, तालुका महासचिव, सुधाकर कदम तालुका युवा उपाध्यक्ष, जी. एन कांबळे तालुका उपाध्यक्ष, रवी पडघने तालुका संघटक अतुल वाढवे खरुस शाखाप्रमुख गजानन सावतकर खरूस उपशाखाप्रमुख आशिष काळबांडे तालुका सचिव,प्रभू काळबांडे तालुका संपर्कप्रमुख इत्यादी कार्यकर्त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवड झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्हाध्यक्ष जॉन्टी भाऊ विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद राऊत,जिल्हा सचिव आत्माराम आडे यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!