शहर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिमायतनगर ,नगर पंचायत येथे अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिमायतनगर नगर पंचायत कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
​याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखील, नगरसेवक सरदार खान, नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास, नगरसेविका प्रतिनिधी अब्दुल कलीम आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
​यावेळी वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी डफ आणि शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठी जनजागृती केली. ब्रिटिशांविरुद्ध आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देण्यासोबतच त्यांनी शोषित व वंचित घटकांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘फकिरा’सारख्या अजरामर साहित्यातून त्यांनी मानवी मूल्ये व राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली.
​या कार्यक्रमास नगर पंचायतीचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक, शेख जुबेर, समाजसेवक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button