नागरिकांनो सावधान…हिवरा(संगम) मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस १५ जणांना घेतला चावा

महेश कामारकर /महागाव:-
पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच हैदोस घालुन जवळपास १५ जणांना चावा घेतल्याची घटना हिवरा(संगम) मध्ये घडली असुन यामध्ये लहान मुले,महिला,पुरुष यांचा समावेश आहे.या पिसाळलेल्या कुत्र्याच्या भीतीने नागरिक मात्र चांगलेच धास्तावले आहे.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच कहर केला असुन आज शनिवार(दिनांक २०जुलै) रोजी तब्बल १५ लहान मुले,महिला व पुरुषांना चावा घेतला असुन यामध्ये काहींना किरकोळ तर काहींना गंभीर स्वरूपाची ईजा झाली असल्याची माहिती असुन जखमी नागरिकांना पोहंडूळ,माहुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्राम पंचायतच्या वतीने प्रयत्न केल्या जात असुन हिवरा गावातील व बाहेर गावावरून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी आपली व आपल्या सोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन उपसरपंच शरद कदम यांनी केले आहे.