Uncategorized
रेती माफिया वाल्याची धमकी पोलीस स्टेशन महागाव येथे गुन्हा दाखल

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात पोहंडूळ येथे शेतकरी रतनला द्वारकाप्रसाद जयस्वाल यांच्या शेताजवळील नाल्यातून वाळू ट्रॅक्टरने नेतांना शेतामधून जात असल्यामुळे त्यांनी फोन करून पटवारी यांना माहिती दिल्यामुळे आरोपी अमोल माधवराव कदम यांनी त्याच्या घरी जाऊन तू रेती घेऊन जात असल्याची माहिती पटवारी यांना माहिती का दिली म्हणून शिवीगाळ करून जीवाने मारण्याची व ट्रॅक्टर अंगावर घालून उडून देतो अशी धमकी दिल्यामुळे जयस्वाल यांनी पोलीस स्टेशन महागाव येथे दिनांक २८-५-२०२५ रोजी लेखी तक्रार दिली त्यावरून अपराध क्र 0438/२५ भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) 2023 नुसार कलम 352,351(2) नुसार गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे