Uncategorized
स्व. कशिश फाळके यांचा वाढदिवस साजरा…

हादगाव:प्रतीनीधी बालाजी पाटील
- दि. १३ जुलै 2024 रोजी श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय हदगांव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून स्व. कशिष बापुराव फाळके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गेल्या महिनयातच दिनांक 19 जून 2024 रोजी कशिष बाबुराव फाळके यांचे अपघाती निधन झाले होते. कशिष बाबुराव फाळके हे उमरी जहागीर येथील रहिवासी होते त्यांचा संपर्क गावातील व परिसरातील सर्व जाती धर्मातील लोकांसोबत चांगला होता. त्यांच्या अंत्यविधीला अलोट अशी गर्दी जमली होती जनु एखादा पुढारी आलाय संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता काही दिवस जाता लगेच कशिष बाबुराव फाळके यांचा वाढदिवस आला म्हणून गावातील सर्व जाती धर्मातील तरुणांनी पुढाकार घेऊन स्व. कशिष बापूराव फाळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्य हदगाव येथील श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय हदगांव या ठिकाणी रुपेश पाटील मित्र मंडळ व गावातील सर्व जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येऊन कशिष बाबुराव फाळके यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले यामध्ये रुपेश पाटील अमृते, विजय कदम, मोतीराम कदम,ओमकार महाजन, अमोल कदम, हर्षभ शिंदे, तथागत कदम, निशांत कदम, गौरव कावळे, करण कावळे, एकनाथ फाळके, प्रफुल्ल कदम, अमोल सदावर्ते ओमकार जाधव, धनंजय शिंदे, रवि शिंदे, अशीष फाळके, रवी मुद्देवाड, किरण इंगोले, बालाजी विठ्ठलवाड, गौतम पैकराव, शेख मुजाहिद, विक्रम शिंगणकर, गणपत कदम, अभिजित मोरे, विश्वम्बर फिरंगे, दिगंबर फाळके, क्रिष्णा फाळके, ऋषी हटकर, मतीन शेख, अंकुश शिंदे, अनिकेत सदावर्ते, संकेत फाळके, व असंख्य गावातील तरुण उपस्थित होते.