मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमउमरखेड

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
:- दि04 आज दिनांक 04डिसेंबर2023रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 82- उमरखेड वि.स.म.स. केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक, आशा वर्कर यांची आढावा सभा. घेण्यात आली.मा.उपविभागीय अधिकारी डॉ.श्री.व्यंकट राठोड

साहेब, मा.तहसीलदार डॉ.श्री.आनंद देऊळगांवकर साहेब, नायब तहसिलदार वैभव पवार, साहेब तसेच सतिष दर्शनवाड उमरखेड गट शिक्षण अधिकारी तथा अतिरिक्त् सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सतिष दर्शनवाड साहेब उमरखेड यांनी मार्गदर्शन करतांना . सभेत 18-19 वयोगटातील व्यक्तीची मतदार नोंदणी वाढवणे. , विशेष महिलांची मतदार नोंदणी वाढवणे. ,दिव्यांग मतदारांची नाव नोंदणी करणे. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे मतदार यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे शोधने व चिन्हाकींत करणे आणि उपेक्षित घटक मतदार नोंदणी बाबत सुचना दिल्यात.सदर सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करने. मतदार यादीतुन मय्यत व्यक्तिचे, कायम स्वरुपी स्थांतरित व्यक्तिचे नाव शोध घेऊन नमुना 7 भरणे,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व रास्त भाव दुकानदार यांचे कडील रजिस्टर वरुन नावाची पडताडनी करुन सुटलेले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे करीता नमुना 6 भरणे मतदार यादीतील घर क्रमांकासमोरील क्रमांकांची दुरुस्ती करणे करीता नमुना 8 भरणे तसेच मतदार यादी वाचनाचे इतिवृत्त लिहणे आणि आढळून येणा-या त्रुटि ची पुर्तता करणे इत्यादि बद्दल मा. उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांचे कडुन सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
