Uncategorized

डॉक्टर मंडळीच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड :अमोल उत्तमराव कुकडे वय वर्षे ३८ राहणार हुडी ता . पुसद जिल्हा यवतमाळ यांची पत्नी उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील माहेर असलेली मुलगी आहे .तिला प्रसव वेदना होत असल्यामुळे उमरखेड येथील शासकीय उत्तरवार रुग्णालयामध्ये बाळांतपणासाठी भरती केलेले होते . त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तिच्यावर सिजरिंग शस्त्रक्रिया केली . या शस्त्रक्रिया नंतर या महिलेची तब्येत खालावत गेली आणि रक्तस्त्राव वाढतच गेला म्हणून या महिलेला नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु त्या ठिकाणी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला .या महिलेच्या मृत्यूला उमरखेड शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप तिचे पती अमोल उत्तमराव कुकडे यांनी केला असून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून उमरखेड पोलीस स्टेशनला आता ७/७/२०२४रोजी तक्रार दिलेली आहे .उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय अनेक दिवसापासून अस्तित्वात आले असताना सुद्धा या ठिकाणी अनेक गैरसोयी पाहायला मिळतात .रुग्णाकडे लक्ष दिले जात नाही – स्वच्छतेचा अभाव असतो -अनेक रुग्णाला पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविले जाते आणि अशी एखादी शस्त्रक्रिया केली तर मृत्यूला आमंत्रण मिळते .यापूर्वी सुद्धा ह्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करताना महिला डॉक्टरने नॅपकिन पोटाचा विसरून ठेवला होता ही घटना ताजी असताना आज पुन्हा प्रतीक्षा अमोल कुकडे या महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये खळबळ उडाली असून डॉक्टर प्रति नागरिकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे .अशा पद्धतीने निष्काळजीपणाने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांवर व त्यांच्या टीमवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून अमर उत्तमराव कुकडे यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे तक्रार दिलेली असून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोळंके पुढील तपास करत आहेत .या प्रकरणात डॉक्टरांवर काय कारवाई होते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!