पत्रकाराला बंदुकीने उडवून जीवाने मारण्याची धमकी पोफाळी पोलिसात तक्रार दाखल

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
प्रशासनाला अवैध व्यवसायाची माहिती का देतोस या कारणावरून डोंगरगाव येथील पत्रकार प्रशांत देशमुख यांना बंदुकीने उडवून जीवाने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सय्यद मोसिन सय्यद रऊप व सय्यद मुसबीर सय्यद जमील राहणार डोंगरगाव यांच्याविरुद्ध पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे बंदूकधारी अवैध व्यवसाइक गुंडाराज करीत असून गावात आपली दहशत निर्माण करीत असल्याचा प्रकार डोंगरगावात घडत आहे दिनांक 12

जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता च्या दरम्यान पत्रकार प्रशांत देशमुख शेतात जात असताना डोंगरगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रोडवर त्यांची मोटरसायकल सय्यद मोसिन सय्यद रऊप यांनी अडवून तु सय्यद मुसबीर सय्यद जमील या माझ्या माणसाच्या रेती व मुरमाच्या गाड्याची प्रशासनाला माहिती का देतोस या कारणाच्या संशयावरून व सय्यद मुसबीर सय्यद जमील यांच्या सांगण्यावरून बंदुकीने उडवून जीवाने मारून टाकतो अशी धमकी दिल्या प्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत देशमुख यांनी तक्रार देण्यात आली आहे . डोंगरगावातील अवैध्यवसायिक सय्यद मुसबीर सय्यद जमील हा गुंड प्रवृत्तीचा असून यांच्यावर नुकत्याच काही दिवसापूर्वी अवैध मटका अवैध रेती व्यवसायावर प्रशासनाने कारवाई

करण्यात आली असता याच्या बातम्या पत्रकार प्रशांत देशमुख यांनी प्रकाशित केल्या असता याचाच संशय निर्माण करून पत्रकार प्रशांत देशमुख यांच्यावर हा प्रकार घडून आणल्याचे तक्रारीत नमूद केले आहे डोंगरगावात बंदूकधारी अवैध व्यावसायिक गुंडाराज करीत असुन गावात आपली दहशत निर्माण करीत असल्याने गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यानी या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून डोंगरगावातील अवैध व्यवसायिकाचे गुंडाराज संपुष्टात आणण्याची मागणी जोर धरीत आहे.