कासारबेळ, सेवानगर परिसरात अस्वलाचा वावर
जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राण्यांचा गावाकडे मोर्चा; शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील कासारबेळ व सेवानगर परिसरात जंगलालगत असलेल्या भागात अस्वलाचा वावर आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गाव व शेतशिवाराकडे येत असल्याचे दिसून येत आहे.
वाकान शिवारात यापूर्वी वाघाचा वावर आढळून आला होता, तर दगडतर शिवारात अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे सध्या अस्वलाचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जंगलातील नैसर्गिक पाणवठे व जलस्रोत आटत चालल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी वन्यप्राणी मानवी वस्तीकडे तसेच शेतशिवारात येण्याची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष सावधगिरी बाळगावी. एकट्याने शेतात जाणे टाळावे तसेच वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास त्यांच्याजवळ जाण्याचा किंवा त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, वन विभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करण्यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. जंगलात पाण्याची व्यवस्था उपलब्ध न केल्यास वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे व शेतशिवारात येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वन विभागाने याची वेळीच दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



