Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

वृत्तपत्रांच्या दणक्याने अखेर बिटरगाव पोलिसांची कारवाई
बनावट ठराव प्रकरणी ग्रामपंचायत सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत राहूर येथील अंशकालीन स्त्री परिचर पदाच्या निवडीसंदर्भात बनावट ठराव तयार केल्याच्या प्रकरणात अखेर बिटरगाव पोलिसांनी ग्रामपंचायत सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी यापूर्वी तक्रार दाखल होऊनही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याने दैनिक महासागर व उमरखेड वार्तामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. वृत्तपत्रांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर पोलिस प्रशासनाने दखल घेत अखेर ३० सप्टेंबर २०२६ रोजी कारवाई केल्याने परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
फुलसावंगी येथील वैद्यकीय अधिकारी सर्फराज नवाज शेख यांनी यापूर्वी बिटरगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रार करूनही गुन्हा दाखल न झाल्याने प्रकरण चर्चेत आले होते.
दरम्यान, ग्रामपंचायत राहूर येथील अंशकालीन स्त्री परिचर पदाच्या निवडीसंदर्भात कविता भगवान जामकर यांच्या नावाने जावक क्रमांक १३४/२०२६ अन्वये १५ एप्रिल २०२६ रोजीचा ठराव तयार करण्यात आल्याचे समोर आले. या ठरावाबाबत झालेल्या चौकशीत तो बनावट असून त्यावर ग्रामपंचायत सचिव शिवाजी रामचंद्र गोपनवाड यांची सही असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले.
चौकशी अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने दैनिक महासागर व उमरखेड वार्तामध्ये या विषयावर वृत्त प्रकाशित करण्यात आले.
वृत्तपत्रांच्या वृत्ताची दखल घेत अखेर बिटरगाव पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल केला. शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
तक्रार दाखल होऊनही कारवाईस विलंब का झाला, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत असून, चौकशी अहवालानंतर झालेल्या पोलिस कारवाईकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरोपीला अटक करून रेकॉर्ड जप्त करून कारवाई केली जाईल असे चौकशी अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीला कळविले आहे


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button