Uncategorized

कृषी कन्यांचे बियाणे उगवण क्षमता संदर्भात मार्गदर्शन :-

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषी कन्या बियाणे उगवण क्षमता संदर्भात उमरखेड तालुक्यातील बेलखेड या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाणे यांच्या गुंतवणूक करीत आहेत जसं घरी साठवलेलं किंवा बाजारातून विकत आणलेले बियाणे पेरणीसाठी वापरायचे असल्यास पहिले त्या बियाण्याची जर उगवण क्षमता तपासून पाहिली तर ते पेरण्यास योग्य आहे की नाही हे आपल्याला समजून येते जर आपण हे तपासून न पाहता त्या बियाण्याची पेरणी केली व पाच ते सात दिवसानंतर ते उगवलं की नाही ते तपासण्याकरिता शेतात जातो आणि काही वेळेस न उगवलेले बियाणे पाहून निराश होतो त्यामुळे पुन्हा पेरणी अतिरिक्त पैसा आणि मेहनत करावी लागते हे टाळण्याकरिता बियाणे उगवण क्षमता तपासणी किती आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे कृषी कन्या कु.जानवी भंडारवार, कु.चंचल डोईफोडे, कु.विद्या कदम, कु.कल्याणी कदम, कु.ऐश्वर्या जाधव, देवी श्रीनिजा यांनी गोणपाट या सोप्या व सरळ पद्धतीने बियाणे उगवण क्षमता कसे पाहायचे हे थोडक्यात सांगितले . सदर मार्गदर्शनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले सर वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री वाय. एस. वाकोडे सर व श्री ए. एस. राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्याचप्रमाणे बेलखेड या गावातील सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी वर्ग उपस्थित होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!