रेती माफियानीं अनेक जागी अडवल्या नंतरही रेतीचोरी करणारा ट्रॅक्टर महसूल पथकाने केला जप्त

मुळावा परिसरातील घटना
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- तालुक्यातील मुळावा परिसरात हातला नांदला तिवरंग झाडगाव पैनगंगा नदी पात्रातून अनेक महीन्यापासून मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरु आहे.या परिसरात संबंधित प्रशासनाच्या कृपादयेने अनेक रेती माफिया उदयास आले असून शासनाच्या नाकावर टिचून दिवसरात्र रेती चोरीचा गोरखधंदा सुरु आहे.अश्यातच तिवरंग नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने शनिवारी रात्री ११:४५ वाजता सुकाळी(न)येथे पकडल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे . मुळावा परिसरात झाडगाव तिवरंग ते नांदला या पैनगंगेच्या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा गेल्या काही महिन्यांपासून सर्रास सुरू होता. याकडे मात्र, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत होते. परंतु, उमरखेड तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्या पासून मंडळ अधिकारी गजानन सुरोशे यांनी वाळू तस्करांवर कारवाईचा भडिमार सुरू केला व त्यातूनच काल रात्री तिवरंग ते मुळावा दरम्यान नवीन सुकळी येथे सदर कार्यवाही करून ट्रॅक्टर जप्त केला आहे.ट्रॅक्टर जप्त करून उमरखेड तहसील ला नेतांना मुळावा तिवरंग सुकळी हातला येथील रेती माफियांचे टोळके दुचाकीने अनेक जागी महसूल च्या पथकाला अडविल्याचे व पोलीस पथक सुद्धा उशिरा पोहोचल्याचे महसूल च्या कर्मचाऱ्यांनी यावेळेस सांगितले. सदर कार्यवाहीने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे हे नक्कीच.
सदरची कार्यवाही मा उपविभागीय अधिकारी व मा. तहसीलदार सर यांचे मार्गदर्शनात गजानन सुरोशे मंडळ अधिकारी, प्रकाश माने मंडळ अधिकारी, धम्मपाल कांबळे वाहन चालक यांनी केली आहे