निकृष्ट दर्जाची रस्त्याचे कामे दर्जा सुधारून वेळेत पूर्ण करा संतोष आडे यांचे आमरण उपोषण सुरू

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड अंतर्गत होत असलेल्या सन 2022 23 च्या प्रशासकीय मान्यतेनुसार सुरू झालेली कामे निकृष्ट दर्जाची होत असून या कामांचा दर्जा सुधारून व या सर्व कामांना वेळेत पूर्ण करून न घेतल्यामुळे उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करा या मागणीसाठी मुळावा येथील संतोष देवसिंग आडे यांनी दिनांक 25 मार्चपासून सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.
उमरखेड उपविभाग अंतर्गत होत असलेल्या विविध रस्त्यांच्या कामासाठी प्रशासकीय
मान्यता मिळालेली आहे माळआसो ली मोहदरी पिंपरी या गावातील रस्त्यासाठी सात कोटी रुपये दगड धानोरा मुळावा पूल तरोडा ते कळमुला या रस्त्यासाठी चार कोटी रुपये पुसद उमरखेड रस्त्यासाठी 14 कोटी 43 लाख रुपये तर उमरखेड हारदरा रस्त्यासाठी सात कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळून कामे सुरू झालेली आहेत. परंतु ही कामे सुमारे दर्जाची होत असून या कामांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता निकृष्ट दर्जाचे काम वेळ निघून गेल्यानंतरही अपूर्ण राहिले असल्यामुळे या कामात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाल्यामुळे काम निकृष्ट होत आहे त्यामुळे आपण आमरण उपोषण करत असल्याचे संतोष आडे यांनी निवेदनात म्हटले आहे.