मत मोजणीसाठी नियुक्त* अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्वितीय प्रशिक्षण

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड दि. 24 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन इमारत एमआयडीसी परिसर लिंबाळा मक्ता जिल्हा हिंगोली येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना द्वितीय प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाच्या वेळी मत मोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सर्व बाबींची माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी कक्षामध्ये कोणालाही भ्रमणध्वनीचा वापर करता येणार नसल्याचे सांगितले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उमरखेड तहसिलदार आर यु सुरडकर , गट विकास अधिकारी प्रवीण कुमार वानखडे नायब तहसिलदार एम. डी. नकितवाड,नायब तहसिलदार वैभव पवार, नायब तहसिलदार आर एम पंधरे, नायब तहसिलदार सुभाष पाईकराव ,मंडळ अधिकारी संजय वाघमारे, मंडळ

अधिकारी संजय नरवाडे, वसंत बोदगिरे यांच्या उपस्थितीत आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशिक्षण पार पडले.