शहर

उमरखेड येथे अन्न प्रशासन विभागाची बेधडक कार्यवाही

जवळपास सव्वा लाख रुपयांचा गुटखा जप्त

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड:- दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अन्न औषद प्रशासन मार्फत अवैध रित्या विक्री करण्यात येणारा जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.


अमित कुमार अशोक कुमार उपलत अन्नसुरक्षा अधिकारी महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी सापळा रचून आरोपी सचिन रमेश शिंदे वय 26 वर्ष राहणार मार्लेगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्या राहते घरी गाईच्या गोठ्यात पान मसाला 192 पुढे, सुगंधी मसाला जर्दा 509 पाकीट , सुगंधी प्रतिबंधक गुटखा अंदाजे 83.37 किलो वजनाचा अंदाजे किंमत एक लाख 23 हजार 54 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध 188,273, 328, भांदवी सह कलम 58 अ 2006 कलम २६(२), 27( 3), 30 (2) (A) कलमांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली .पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल राठोड व जमादार नरेंद्र पुंड, मेजर रामदास इंगळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!