Uncategorized
कावुरवाडी येथे विजेच्या तारा एकमेकांना लागून ठिणग्या; मोठ्या घातपाताचा धोका

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात — कावुरवाडी येथे विजेच्या तारा एकमेकांना लागल्याने सतत ठिणग्या व आगीचे गोळे खाली पडत असल्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कोणताही मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी मुडाना येथे अविनाश चेंडके यांच्या घराला याच प्रकारे आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे कावुरवाडी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संभाव्य घातपात टाळण्यासाठी कावुरवाडी येथील जागरूक नागरिकांनी तात्काळ महावितरण (एम.एस.ई.बी.) अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्वरित दखल घेऊन दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.



