Uncategorized

बोथा (सा.) येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथासोहळ्याची सांगता सभामंडपासाठी ₹२० लाख निधीचे अभिवचन; युवकांच्या व्यायामशाळेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी बोथा (सा.) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. या पावन प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य तानाजी बापू बोरकर महाराज यांचे साक्षात मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.
या धार्मिक सोहळ्यादरम्यान उपस्थित भाविक-भक्तांशी संवाद साधत जीवनात धार्मिक आचरण, संस्कार व सदाचाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गावकऱ्यांनी मांडलेल्या सभामंडप उभारणीच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत ₹२० लाख रुपयांचा निधी देण्याचे अभिवचन देण्यात आले.
यावेळी गावातील नवयुवक मंडळींशीही सखोल संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. युवकांनी मांडलेली व्यायामशाळेची प्रमुख मागणी तात्काळ मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
हा सोहळा धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि युवक सशक्तीकरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button