तहेजीब फाउंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 25 जोडपे विवाहबद्ध ;

नांदेड येथील होंडा शोरूम चे मालक हाजी अब्दुल वहिद सेठ यांच्या कार्याचे कौतुक
शेख जुबेर
जिल्हा प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर येथे मदनी फंशन हॉल मध्ये आज दिणांक:- 28/04/2024 रोजी तहेजीब फाउंडेशन च्या वतीने 18 वयो वर्षावरील 25 मुस्लिम मूला मुलींचे विवाह नुकतेच पार पडले आहे,

सविस्तर असे की नांदेड येथील होंडा शोरूम चे मलाक संचालक आदरणीय हाजी अब्दुल वहीद सेठ यांच्या तहेज़िब फाउंडेशन कडून
गेल्या 16 वर्षा पासून
18 वयो वर्ष गटातील मुस्लिम गोर गरीब मूला मुलींचे लग्न केले जात आहे,
16 वर्षा पासून दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी तहेजीब फाउंडेशन कडून 25 जोड़पे विवाह बद्ध झाले आहे,

तहेज़ीब फाउंडेशन कडून आता पर्यंत 16 वर्षा मध्ये 400 च्या जवळ पास गोर गरीब मुस्लिम मूला मुलींचे लग्न झाले असल्याची माहिती मिळत आहे, यामुळे आदरणीय हाजी अब्दुल वहिद सेठ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, व तसेच ह्या लग्न सोहळ्यात बरतन भांडी, कपाट, पंखे, असे जीवन आवश्यक वस्तू वधू वरास देण्यात आले, या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होऊन वधू वरासाठी दुआ करून, आशीर्वाद दिले,
या विवाह मेळाव्या चे नियोजन हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी हाजी अब्दुल मुबीन सेठ, यांचे भाऊ मोहम्मद आमेर, हे व त्यांचे सोबत खुददूस मौलाना, हफीज अजिम, मौलाना रफ़ीक़, हाफीज एजाज, शेख शब्बीर भाई, फहाद खान, हाजी मोहम्मद तमजिद, एसडी आदिल, मोहम्मद शोएब, अब्दुल इरफ़ान, शेख इब्राहिम, ( इब्बू ) अब्दुल नईम, सोहेल खान यांच्या सेवा सहकार्य असून, या विवाह सोहळ्यात सेवक, अब्दुल रय्यान, सय्यद सईद, अब्दुल अब्बु, सय्यद आवेज, शेख
शाहीद, शेख अश्फाख, शेख, शेख शोएब, आवेज, सहित अनेक सेवकांनी भोजन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली,

यावेळी प्रमुख पाहुने हदगाव हिमायतनगर चे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफिक सेठ, माजी उपनगर अध्यक्ष मोहम्मद जाविद, माजी नगर सेवक फेरोज खान, मौलाना कासीम, तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान, सईद सेठ, अब्दुल बाकी भाई, बाबा खान, हे उपस्थित होते,