Uncategorized

पालकमंत्री यांची पूरग्रस्त चिंचोली गावाला भेट तात्काळ उपायोजना करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम गावाला चोहू बाजूने पाण्याने वेढलेले होते व त्यातच शेतकरी बांधव, नागरिकांचे अतिवृष्टीमुळे शेती, घते व पशुधनाचे मोठे नुकसान झाले. पूर ओसंडून वाहणाऱ्या नाले तसेच नदीमुळे गावातील घरांची पडझड झाली तसेच शेतात पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. मा. ना.

श्री संजय राठोड, (मंत्री मृद्ध व जलसंधारण) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ यांनी चिंचोली (संगम) गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सरकार आणि प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर पंचनामे करून येत्या काही दिवसात त्यांना प्राथमिक मदत करण्यात येणार असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे प्रशासनाचा निर्देश दिले.
यावेळी उमरखेड – महागावचे आमदार किसनराव वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, उपविभागीयअधिकारी

सखाराम मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डांबरे, उमरखेड तहसीलदार राजेश सुरडकर , गट विकास अधिकारी किरण कोळपे, माजी जिल्हा परिषद सदस्य चीतांगराव कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य, उपजिल्हाप्रमुख बी. एन. चव्हाण यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे जिल्हा व तालुक्यातील संबधित वरिष्ठ अधिकारी, महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button