Uncategorized

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

हिंगोली (जिमाका), दि. 03 : हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सूक्ष्म निरीक्षक यांच्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, प्रशिक्षणाचे पथक प्रमुख डॉ. दीपक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी सूक्ष्म निरीक्षकाचे काम, जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत पीपीटीच्या साहाय्याने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 104 सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधान करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून अमोल निळेकर, चंद्रकांत धुमाळे. बजरंग बोडके, दीपक कोकरे, विजय बांगर, अरुण बैस आणि बालाजी काळे यांनी काम पाहिले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!