Uncategorized

बनावट दस्तऐवजाच्या आधारे एकाच जमिनीची दोनदा विक्री

दस्त लेखकासह सात जणांवर गुन्हे दाखल

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड बनावट दस्तावेजाच्या आधारे एकाच जमिनीची दोनदा विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार खंड दोनमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी दस्त लेखकासह नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

बिस्मिला बेग अमीर बेग उर्फ अमीर खान (७२), शकील बेग बिस्मिला बेग (५०, दोघेही रा. ताजपुरा वॉर्ड), सैफुल्ला खान गुलाब खान (५२, रा. महात्मा फुले वॉर्ड), दीपक मुटकुळे व अन्य अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी बिस्मिला बेग अमीर बेग याने उमरखेड खंड दोनमधील एक हेक्टर ५७ आरपैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण बाजुची बिटरगाव-उमरखेड रस्त्यालगतची ०. हेक्टर ४० आर शेती ४ जून २०२० रोजी नोंदणीकृतद्वारे सैफुल्ला खान गुलाब खान (५२, रा. उमरखेड) व इतर नऊ जणांना विक्री केली. परंतु, फेरफार प्रलंबित असल्याचा व सातबाऱ्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेत ८ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा त्याच शेतीचा उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिम भागाची ० हेक्टर ५५ आर शेती खोट्या दस्तांच्या आधारे खरेदीखत करून विक्री केली. त्यासाठी अन्य आरोपींनी मदत केली. हा प्रकार लक्षात येताच फसवणुकीची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून पुरावे गोळा करणे सुरू केले आहे. अधिक तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश सरदार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!