Uncategorized

तुम्हाला वाटत असेल जबरदस्तीने थोपवलेले काम आहे तर तुम्ही खुपमोठ्या आनंदाला मुकनार आहात

मा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी हिंगोली जितेंद्र पापळकर

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

15हिंगोली 82उमरखेड लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग संपन्न
उमरखेड:-21(उमाका) 15-हिंगोली लोकसभा निवडणूक च्या तयारीचा 82-उमरखेड विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग आज राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला या प्रशिक्षण वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,यवतमाळ

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार सुरडकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले उमरखेड लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग संपन्न
15-हिंगोली लोकसभा निवडणूक च्या तयारीचा 82-उमरखेड विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग आज राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला या प्रशिक्षण वर्गाला हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पहिल्या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली.निवडणूक निर्णय तथा हिंगोली अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला तुम्हाला वाटत असेल जबरदस्तीने थोपवलेले काम आहे, तर तुम्ही खुपमोठ्या आनंदाला मुकनार आहात

आज पासुन आंनदाने 26 तारखेपर्यत आंनदाने सहभागी व्हा, आपण मतदानाच्या अनुषंगाने 18 लाख लोकसंख्या असलेल्या मतदारा पर्यंत पोहचनार आहो. आपली कामे चागल्या प्रकारची असावीत तुमचे काम तुम्हाला करावे लागणार आहे. निवडणूक आयोगाची काम करत असताना त्याचे निदेशपुस्तीका पाहावे वांरवार वाचले पाहिजे निवडणूक आयोगाने सांगीतलेली अशी कोणती गोष्ट त्यामध्ये नाही .त्या पुस्तीकामध्ये नियम व अटी त्या पुस्तीका मध्ये मिळतील आपल्या मतदान च्या अगोदर च्या दिवसा पासुन 25 तारखे पासुन 26 तारखेच्या सांयकाळ पर्यंत अशा सर्व गोष्ठी ह्या पुस्तकात लिहील्या आहे. दिनांक 25 आणि 26 तारखेच्या ज्या गोष्टी मध्ये शंका असल्यास पुढिल प्रशिक्षणात दुर करता येईल त्या साठी आपणास पुस्तीकाचे वाचन केले पाहिजे आणि डाऊट क्लियर केले पाहिजे निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत कि ,‌कोणालाही मतदाना पासुन वंचित ठेवता येणार नाही.सेक्टर आफिसर हे मतदान केंद्रावरच राहणार आहेत प्रत्येक दोन तासानी मतदान किती झाले त्या वर लक्ष वोटर ट्रन आऊट साठी ऑन लाइन ॲप व्दारे लक्ष ठेऊन

असणार आहे. आयोगाचे पुस्तकच आपल्याला वाचवु शकते चुकि पासून माफी नाही चुकी होऊ देऊ नका. असे 15 हिंगोली 82 उमरखेड निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पहिल्या प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन केले.15 हिंगोली 82 उमरखेड निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर व निवडणूक निर्णय अधिकारी तथा यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे मार्गदर्शनात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसिलदार आर. यू. सुरडकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!