Uncategorized

हिवरा संगमच्या विकासाला कोट्यवधींची चालना विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
हिवरा संगम परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा २३ ऑगस्ट रोजी हिवरा येथे आई एकविरा देवी संस्थान परिसरात उत्साहात पार पडला. महागाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये श्री एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकासासाठी १ कोटी रुपये, मेन रोड ते मंदिर रस्त्यासाठी ३० लाख रुपये, ग्रामपंचायत भवनासाठी २५ लाख रुपये, स्मशानभूमी रस्त्यासाठी १४ लाख रुपये, नवीन वर्गखोली बांधकामासाठी १३ लाख रुपये, संत गाडगेबाबा सभामंडपासाठी १० लाख रुपये आणि अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी १० लाख रुपये अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.
ही कामे उंबरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांच्या निधीतून करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे नितीन भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण पाटील ठाकरे, विलासराव कव्हाणे, दीपक आडे, मुकुंदराव पांडे, शेषराव खंदारे, धोंडीराव बोरुडकर, पंजाबराव पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिवरा संगम परिसरातील पायाभूत सुविधा, धार्मिक पर्यटन, शिक्षण आणि ग्रामविकासाला या कामांमुळे नवीन दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button