शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या : साहेबराव कांबळे

काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषदेतून मागणी .
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : -तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यातच प्रशासनाने अतिवृष्टीच्या तोंडावर, इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेत सोडल्याने, शेतकऱ्यांचे उभे पीक भुईसपाट झाले. हळद, कापूस, उडीद, तुर यासह उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या मानव निर्मित परिस्थितीला संपूर्णतः शासनाची जबाबदार असून, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या. अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, साहेबराव कांबळे यांनी 25 अगस्तरोजी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले .
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, माजी जि प अर्थ बांधकाम सभापती राम देवसरकर, प्रेमराव वानखेडे उपस्थित होते. कांबळे यांनी पुढे बोलताना म्हणाले की, ईसापुर प्रकल्पात 95 टक्के जलसाठा असताना शासनाने पाणी सोडले नसून शंभर टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा आरोप साहेबराव कांबळे यांनी केला. दर वेळेस प्रशासन कापूस, सोयाबीन, मूंग, उडीद या पिकाचा सर्वे करीत असते परंतु उसाचा सर्व्हे अजिबात करीत नाही. ऊसाचे पीक आपल्या तालुक्यात सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असतो. त्यामुळे शासनाने ऊस या पिकाचाही सर्वे करून सर्वाधिक अनुदान द्यावे अशीही मागणी केली. पैनगंगेच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला सर्वाधिक जबाबदार शासन असून, या महापुरामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक तसेच जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील चार वर्षात दराटी शिवाजी नगर या गावाला येथील आमदारांनी अद्यापही कुठले निधी दिला नसून, त्या गावातील तलावाला तडे गेले आहेत. त्यामुळे कधीही तेथील तलाव फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे .तसेच या सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत पूर पिडी दिली नसून रस्ते तलाव पुलाचा अद्यापही येथील आमदारांनी विचार केला नाही. पूर परिस्थितीत या सरकारचा सर्व पितळ उघड पडलं असल्याचेही सांगितले.
भर उन्हाळ्यात पंचावन्न टक्के जलसाठा ईसापुर प्रकल्पात असताना, पाणी सोडण्यात आले नाही. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. सिंचनाखालील शेती क्षेत्राला पाणी सोडले नसून इसापूर प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर पाणी सोडून शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान या शासनाने केले. याला संपूर्ण जबाबदार सत्ताधारी व प्रशासन असल्याचाही घनाघात कांबळे यांनी केला. एकीकडे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प सुरू करून सत्ताधारी दवंडी देत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून कोटेशन भरून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना आपापल्या शेतात सोलार बसवण्यासाठी शासन आग्रह करत आहे, मग सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प कशाला, हे फक्त स्वार्थासाठीच प्रकल्प होत आहे का, असा हल्ला सत्ताधाऱ्यांवर कांबळे यांनी केला .
चौकट
सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प या भागाला गरज नसताना विधानसभेमध्ये आमदारांनी प्रश्न उचलणे हे जनहिताचे नसून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत, इसापूर प्रकल्प बांधून अनेक वर्ष झाले असताना, शेवटच्या टोकापर्यंत अद्यापही पाणी पोहोचत नाही. या धरणाचा फायदा शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना अद्यापही मिळत नसतना नवीन प्रकल्प बांधायचाच हट्ट कशाला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमचा विकासासाठी कुठलाही विरोध नाही परंतु सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पात जाणाऱ्या शेतीमुळे शेतकरी निस्तानाबूत होणाऱ असल्याने, या प्रकल्पाला आमचा विरोध कायम राहणार आहे.



