Uncategorized

उमरखेड येथे डॉ.बी.डी. चव्हाण यांचे वंचित तर्फे जल्लोषात स्वागत

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 18 फेब्रुवारी) नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून वंचित बहुजन आघाडी मध्ये वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत समर्थकासहीत प्रवेश करणारे नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले ओबीसी नेते उमरखेड तालुक्याचे भूमिपुत्र डॉ
बी. डी. चव्हाण हे सहपत्नी उमरखेड येथे आले असता.

शहरातील माहेश्वरी चौकामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. व त्यांना पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव प्रशांत तथा जॉन्टी विणकरे ,माजी तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे , ज्येष्ठ नेते तातेराव हनवते, देवानंद पाईकराव, समाधान राऊत, संभाजी हापसे, अरविंद धोंगडे, सिद्धार्थ धोंगडे, अथर खतीब, कोकणे साहेब, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर, रमेश घूगरे, बबलू भालेराव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!