शहर

लघु पाटबंधारे विभागाचे नियोजन शून्य; भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला लोअर ऊस प्रकल्पकॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; शेतकऱ्यांचा प्रशासनावर रोष

महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील वेणी येथील लोअर ऊस प्रकल्प हा शेतकऱ्यांना सिंचनाचे आश्वासन देणारा ठरणार होता. मात्र लघु पाटबंधारे विभागातील अनियमितता, निष्काळजीपणा आणि मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचारामुळे हा प्रकल्प आज शेतकऱ्यांसाठी निराशेचे प्रतीक ठरला आहे.

या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय महागाव येथे असून, झिरो ते टेन नंबरपर्यंतच्या क्षेत्रात कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. प्रत्यक्षात मात्र ईजनी व भोसा परिसरातील कॅनॉल जागोजागी फुटलेले आणि निकृष्ट दर्जाचे असल्याने पाणी शेतात वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तरीही अधिकाऱ्यांनी दुरुस्तीच्या नावाखाली बोगस बिले काढून कामे दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्हा सिंचन विभाग (क्र. ४) यातील काही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमत असल्याचेही बोलले जात आहे.

मागील वर्षी जलपर्णी काढण्याच्या कामात सुमारे दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून, प्रत्यक्ष काम केवळ पाच लाखांच्या खर्चात पूर्ण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी “हात ओले” केल्याची चर्चा जोरात आहे.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांत कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याची शंका असून, तरीही शेतकऱ्यांना आजतागायत पाणी पोहोचलेले नाही.

परिणामी, शासनाने केलेल्या खर्चाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही.
सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी या सर्व प्रकरणाचे स्वतंत्र ऑडिट व प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button