हिंगोली लोकसभा मतदारसंघातिल पीकविमा बैठक सहयाद्री अतिथीगृह,मुंबई येथे सुरू

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
हिंगोली लोकसभा मतदारसंघातिल शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळावी आणि हिंगोली जिल्ह्याच्या चुकीचा पीक कापणी अहवाल सादर केल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची चौकशी करण्यात यावी आणि हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे सन २०२२ चा थकलेला पीकविमा मिळावा याबाबत मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहावर राज्याचे कृषिमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज पार पडली.
बैठकीमध्ये मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मांडलेल्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मा.मंत्री महोदयांनी दिले.या बैठकीला राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा.संदीपान भुमरे,आ.तानाजी मुटकुळे, माजी खासदार ऍड.शिवाजी माने,शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर,सहसचिव गणेश पाटील कृषी संचालक दिलीप झेंडे,कृषी सहसंचालक विजयकुमार आवटे, जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड, व्यंकटेश पाटील,राजू कदम,संदीप पाळकर, गजानन शिंदे, आत्माराम पाटील, यांच्यासह आदी उपस्थित होते.