Uncategorized

महागाव नगरपंचायत भष्टाचाराच्या विळख्यात !सभापती निवड वर नगरसेवकाचा बहिष्कार


प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत च्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा अधिकारी विकास मीना यांनी जाहीर केला जाहीर केला त्यावरून 26 मे रोजी नवनिविचित सभापती कोण होणार याची चर्चा सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे माजी उप अध्यक्ष सुरेश नरवाडे नगरसेवक सौभाग्यवती बावणे सौभाग्यवती आडे परवेज सुरैया काँग्रेस गजानन साबळे व इतर नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेऊन सभापती नाकारले व आज निवडणूक निर्णय अधिकारी श्री मुळे साहेब उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांनी सभापती निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता नगरपंचायत येथे अकरा वाजता उपस्थित झाले सर्व नगरसेवकांना दोन दिवस आधीच सभापती निवड बाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या परंतु नगरपंचायत महागाव मध्ये कोणतीही विकासाची कामे होत नसून अध्यक्षांवर नाराजी असल्याचे सूर बोलल्या जात आहे .त्या सभेला अध्यक्ष उपाध्यक्ष शिवाय कोणतेही नगरसेवक हजर नव्हते त्यांनी बहिष्कार टाकला होता.नगरसेवक सुरेश नरवाडे यांनी आपली प्रतिक्रियांमध्ये असे सांगितले की महागाव नगरपंचायत मध्ये कोणतीही विकासाचे कामे होत नसून मनोपली राज सुरू असल्यामुळे एकतर्फी कार्यक्रम राबवीत आहेत.त्यामुळे अध्यक्षावर अविश्वास ठराव आणून सभापती निवडल्या जाईल अशी भूमिका काँग्रेस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व शिवसेनेचे नगरसेवक यांनी ठाम भूमिका घेतली आहे .त्यामुळे सभापतीची निवड वर बहिष्कार टाकल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.त्यामुळे नगरपंचायत निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अध्यक्ष व उपाध्यक्ष शिवाय कोणी हजर नव्हते तसेच अध्यक्ष यांच्या घरचे काँग्रेसचे गटनेते शैलेश कोपरकर एकटेच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यांनी सुद्धा दांडी मारल्याचे दिसून आले.त्यामुळे आता सभापती निवड अध्यक्ष बदलल्याशिवाय होणार नाही असे नगरसेवक बोलत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!