हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाची बैठक संपन्न,

नांदेड जिल्हा प्रतिनिधी अजीम हिंदुस्तानी
अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठक,
हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी, डी, भुसनूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाची बैठक घेण्यात आली, अयोध्या येथील श्री राम प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या दिनांक:- 22/01/2024 रोजी संपूर्ण भारतात प्राण प्रतिष्ठा उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहे,

त्याच अनुषंगाने हिमायतनगर येथे हिंदू समाजाच्या वतीने महा रेली चे आयोजन करण्यात आले व तसेच प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरे करण्यात येत आहे,
त्या कारणाने दोन्ही समजा कडून नेहमी प्रमाणे सहकार्य करून पोलीस प्रशासनाला मदद व्हावी या साठी हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजाची बैठक घेण्यात आली,

नेहमी प्रमाणे हिमायतनगर येथील मुस्लिम समाज हिंदू समाजा सोबत आहे, आम्ही सर्व हिंदू मुस्लिम एकत्र एकमेकांच्या सणात सामील राहतात व 50 वर्ष पूर्वी पासून आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र आहे असे मुस्लिम समाजाने हमी देऊन एकतेचा संदेश दिला, तसेच नेहमी प्रमाणे हिमायतनगर ची शांतता कायम राहील असे मुस्लिम समाजा कडून सांगण्यात आले आहे,

यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्ष बी, डी, भुसनूर, एपीआय नंदलाल चौधरी, कुलकर्णी, व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक माजी, जिल्हा परिषद सदस्य समद खान, माजी नगर सेवक फेरोज खान, माजी नगर सेवक अन्वर खान, शिवसेना अल्प संख्यक तालुका अध्यक्ष जाफमहम्मद खान, अश्रफ खान, पत्रकार मन्नान भाई, ईल्यास खुरेशी, पत्रकार शेख मुजमिल,उपास्थित होते,
