Uncategorized

महागाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; ऑनलाइन फसवणुकीतील 98 हजार रुपये मुळमालकाला परत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलीसांनी ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात तत्पर कारवाई करत तक्रारदाराचे 98 हजार रुपये परत मिळवून देत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCCR) अंतर्गत पोलीस स्टेशन महागाव येथे कैलास उकडंराव वानखेडे (रा. वडद-मुडणा) यांनी त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन फसवणुकीद्वारे 98,000 रुपये गेल्याची तक्रार (Acknowledgement No. 31906260120412) नोंदविली होती.
तक्रारीची दखल घेत महागाव पोलीसांनी सायबर यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने पाठपुरावा करून संबंधित रक्कम होल्ड करत कार्यकौशल्याने 98 हजार रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे तसेच सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल भगत व विरेन चक्रनारायण यांनी केली.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न दवडता 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाणे अथवा सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदवावी. तक्रार जितक्या लवकर नोंदविली जाईल, तितकी फसवणुकीची रक्कम होल्ड करून परत मिळण्याची शक्यता अधिक असते.
या कामगिरीबद्दल महागाव शहरासह परिसरात पोलीसांचे कौतुक होत असून, तक्रारदार कैलास वानखेडे यांनी महागाव पोलीसांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button