पुसद–कोणदरी बस सेवा काळी मार्ग सुरू; नागरिकांना मोठा दिलासा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात काळी (दौ)अखेर पाठपुराव्याला यश पोहरादेवी ते दहिसावळी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मागील काही दिवसांपासून पुसद ते कोणदरी मार्गावरील सर्व बस फेऱ्या काही काळापुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे काळी सर्कल परिसरातील 30 गावांचा संबंध येतो तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना व शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येची दखल घेऊन काळी सर्कल परिसरातील नाईक समर्थक तसेच सामाजिक कार्यकर्ते सईद पटेल, वसंतराव पवार, रमेश बाबूलाल राठोड, सुधाकर धनसिंग राठोड यांनी राज्य मंत्री इंद्रनील नाईक साहेब तसेच मोहिनीताई नाईक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.
अखेर आज त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून काळी मार्गावरील बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील सर्व बस सेवा पूर्ववत सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी , महिला,वयोवृद्ध प्रवाशांनी बस सेवा सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून संबंधित लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.



