महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची उपयुक्त चळवळ भाऊसाहेबांनी पुढे नेली” — “हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे प्रतिपादन”

प्रतिनिधी | उमरखेड :
महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त भाऊसाहेब माने गौरव कृती समिती यांच्या वतीने आयोजित सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ जिजाऊ भवन, उमरखेड येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचा विचार व वारसा लोकनेते माजी आमदार स्व. भाऊसाहेब माने यांनी आयुष्यभर जपला व पुढे नेला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या विभागातील सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व दिवंगत नेते मंडळीच्या स्मरणार्थ सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करणे, ही त्या विचारांचीच पुढची पायरी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. वि. ना. कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेडचे ठाणेदार शंकरराव पांचाळ, शिवाजीराव देशमुख सवनेकर, श्रीराम पाटील नलावडे, अजय माहेश्वरी, डॉ. अमोल देशमुख, नगरसेवक साजीद जहागीरदार, हनुमान पिलवंड, अशोक वानखेडे, निलेश जैन, गजानन रासकर, रवि शिलार, आनंद शिंदे, विश्वंभर वानखेडे, आकाश माने आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वि. ना. कदम यांनी सांगितले की, जग बदलण्याच्या मोठ्या घोषणा करण्यापेक्षा स्वतःपासून व आपल्या गावापासून प्रामाणिक कार्य सुरू करणे अधिक महत्त्वाचे आहे. मानवकल्याणाची कामे निष्ठेने व प्रामाणिकपणे केली तर यश निश्चित मिळते. सततच्या प्रयत्नातून केलेल्या कार्याचा समाजाकडून होणारा सन्मान म्हणजेच गौरव पुरस्कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग असूनही आपल्या कर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण करणारे उद्योजक प्रशांत सराफ यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल त्यांनी भाऊसाहेब माने गौरव कृती समिती व डॉ. विजयराव माने यांच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले.
यावेळी उमरखेड तालुक्यातील समाजसुधारकांच्या कार्याचा उल्लेख करून, त्यांच्या स्मृती जपण्याचे व प्रेरणा देण्याचे मोलाचे कार्य समितीने केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी सहा व्यक्तींचा व दोन सेवाभावी संस्थेचा तालुक्यातील सामाजिक कार्य केलेल्या समाज सुधारक नेते मंडळींच्या स्मरणार्थ सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, प्रास्ताविक सुधाकर वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन बालाजी वानखेडे यांनी केले.
बॉक्स: सत्कारमूर्ती
- सतीश मुडे – क्रीडा क्षेत्र.
- संभाजी भोयर – पत्रकारिता.
- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था – सेवाभावी संस्था.
- प्रशांत माणिकराव सराफ – दिव्यांग उद्योजक.
- नागेश मिराशे – जिल्हा परिषद शाळा, विडुळ (शिक्षण).
- रविता लकडे – महिला सक्षमीकरण
- माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, पुसद – सेवाभावी संस्था
- सुशील मुधळे – रेशीम शेती (शेतकरी)
— सोबत छायाचित्र —



