शहरात बँड बाजा लावून राबविण्यात येत असलेली वसुली मोहीम बंद करा

संयुक्त पत्रकार संघ उमरखेड ची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातुन मागणी
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड शहरातील घराचा कर व नळ पाणी कर इत्यादी करांचा उमरखेड शहरातील नागरिकांकडून भरणा होऊन नगरपालिकेचे उत्पन्न वाढीकरिता आपण राबविलेल्या लकी ड्रॉ या योजना करा बघून आपण चांगल्या प्रकारे कर वसुली करीत आहात त्याचप्रमाणे आपण या लकी ड्रॉ योजनेद्वारे

सुमारे पाच लाखाचे बक्षीस वाटपही केले या स्तुत्य उपक्रमाचा उमरखेडकर स्वागत करीत आहेत परंतु ज्या नागरिकांकडून वसुली येणे बाकी आहे अशा नागरिकांचे घरी नगर परिषदेचे कर्मचारी बँड बाजा लावून त्यांच्या घरासमोर जाऊन वसुलीचा भरणा करण्याची मागणी करीत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. बँड बाजा लावून नागरिकांच्या घरासमोर जाऊन किंवा नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे दुकानात जाऊन वसुलीची मागणी करणे हे योग्य वाटत नाही, कोरोना सारख्या महामारी पासून अजूनही जनजीवन व्यवस्थित झाले नसल्यामुळे प्रत्येक जण आर्थिक अडचणीचा सामना करीत आहे अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे घरासमोर बँड बाजा लावून कराची रक्कम मागणी केल्यास त्या नागरिकाची सामाजिक मानहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत एखादी हळव्या मनाची व्यक्ती असेल तर अशी व्यक्ती आता माझी समाजात बदनामी झाली आता मी जगून काय करू अशा टोकाच्या भूमिकला जाऊन आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही,

नगर परिषदेचे कर्मचारी घरी येऊन वसुलीची मागणी केली त्यामुळे सामाजिक मानहानी झाल्याने एखाद्या अति संवेदनशील गतीने आत्महत्या केल्यास त्याचा आत्महत्येस आणि त्या व्यक्तीच्या जाण्याने त्याच्या कुटुंबाची होणारी कुचंबना या बाबीस नगर परिषद प्रशासन जबाबदार असणार काय? तरी आपण वरील बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण सुरू केलेली बँड बाजा वसुली मोहीम तात्काळ बंद करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे