Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मिळणार वाढीव वेतन

डॉ .मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केली मागणी

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण राज्यात ४००१ एमबीबीएस आंतरवासी विद्यार्थ्यांच्या मध्ये (इंटरशिप ) विद्या वेतन त्वरित वाढ करण्याबाबत डॉ . मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला .शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करणारे विद्यार्थ्यांना अंतरवासित कालावधीमध्ये मिळणारे विद्या वेतन वाढ करण्याबाबत दिनांक २४ जुलै २०२३ रोजी माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्या कार्यालयातून कारवाई सुरू झाली होती त्या अनुषंगाने मान्य नीय आयुक्त यांनी उचित कार्यवाही करत त्यांना 15 ऑक्टोंबर 2023 रोजी आयुक्त कार्यालयामार्फत सचिव वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंतरवासीत विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रु ११ हजार वरून रुपये २२ हजार रू .करण्याबाबतची शिफारस केली आहे तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास ४००१ विद्यार्थ्यांना आंतरवासित कालावधीत मिळणारे सध्याचे विद्यावेतन ११ हजार रु . अंत्यत तुटपुंजी असल्यामुळे आयुक्तालयाने रुपये 22 हजार रुपये प्रतिमाह करण्याची विंनती सभापती नां केली आहे त्याबद्दल आंतरवासीत संघटनेच्या पदाधिकारी यांनी डॉ . मनिषा कायदे यांचे स्वागत केले आहे यावेळी डॉ . अर्थव शिंन्दे, डॉ .यश सुर्यवंशी , डॉ . चैतन्य अग्रवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर संघटनेचे पदाधिकानी हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!