माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळाला यश

ढाणकी गांजेगाव पळसपुर हिमायतनगर रेल्वे स्टेशन बस सेवा सुरु,
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घ्यावा.शेख इरफान शेख गुलाब
. प्रवाशांच्या सोईसाठी ढाणकी येथुन हिमायतनगर गांजेगाव पळसपुर हिमायतनगर रेल्वे स्टेशन ला बस सेवा सुरु करण्यासाठी ऊमरखेड आगार व्यवस्थापक दिप्ती वड्डे मॅडम यांच्या कडे माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळाच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले होते माधवराव प्रवाशी मंडळाच्या मागणी चा विचार करून ढाणकी गांजेगाव पळसपुर हिमायतनगर रेल्वे स्टेशन बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दि 23,रोजीउमरखेड अगाराच्या एसटी बस सेवा ढाणकी सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी सुटून हिमायतनगर येथे रेल्वे स्टेशन ला पाच वाजून 21मिनिटाच्या सकाळी आदिलाबाद परळी रेल्वेवर सकाळची एसटी बस सुरु झाली आहे
उमरखेड आगार प्रमुख कु दिप्ती वड्डे मॅडमयांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाहतुक अधिक्षक श्री जगदिश मनवर साहेब यांनी घेतला आहे तरी सर्व प्रवासी यांनी या सकाळच्या रेल्वेवर जाणाऱ्या बसचा ढाणकी गांजेगाव डोलारी पळसपुर येथील प्रवाशांनी लाभ घ्यावा अशी माधवराव मीटकरे प्रवाशी मंडळाचेअध्यक्ष शेख इरफान ढाणकी हिरासींग ठाकुर ढाणकी नाथा पाटील ढाणकी चांदराव वानखेडे पळसपुर माजी चेअरमन धनंजय मीटकरे सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे पळसपुरकर यांची विनंती आहे