माळवागद येथे भुमीपुजन करूनही सिमेंट रस्त्याचे काम प्रलंबित!( रोडचा निधी गेला कुठे ?)अधिकारी चौकशी करतील का?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील माळवागद येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सिमेंट रस्त्याच्या कामाचे माजी खासदार भावना गवळी यांच्याहस्ते लोकसभा निवडणुकीपूर्वी भुमीपुजन करन्यात आले होते.मात्र सदर रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन करून दोन वर्षे उलटून गेली असतांना सुध्दा सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात करन्यात आली नाही या रस्त्याच्या कामासाठी जनसुविधा योजनेअंतर्गत सनं २०२२-२३ या कालावधीमध्ये ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु आजपावेतो सदर कामाला सुरुवातच करन्यात आली नाही.नुकतेच ग्रामपंचायत माळवागद येथील सिमेंट रस्त्याच्या कामात अपहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे.त्यामुळे संबंधित रस्त्याच्या कामाला दोन वर्षे लोटुनही कामाला सुरुवात न झाल्याने या सिमेंट रस्त्याचे काम भुमीपुजन करूनही रखडले आहे.या कामाकरीता उपलब्ध झालेल्या शासकीय निधीचा कुठे व केंव्हा उपयोग करन्यात आले या बाबत गावातील नागरिक संभ्रमात आहे .बोर्ड लावले आहे थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले मात्र रोड गेला कुठे?
( चौकट )
सनं २०२२-२३ मध्ये माजी खासदार भावना गवळी यांच्याहस्ते माळवागद येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करुन ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मात्र आजपर्यंतही कामाला सुरुवात करन्यात आले नाही अखेर मंजूर निधीचा उपयोग कोणत्या कामासाठी करण्यात आला हे महत्त्वाचे आहे. निधी परस्पर उचलला गेला याची चौकशी होणे गरजेचे आहे



