टेंभी येथे २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील टेंभी येथे एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, २२ मे रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणीचे नाव आरती रामजी वारकड असे असून ती टेंभी येथील रहिवासी होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरती हिने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



