भाजपा तालुका अध्यक्षपदी विठ्ठलराव पाटील वानखेडे व भारतीय जनता पार्टी उमरखेड शहराध्यक्ष पदी अतुलभाऊ खंदारे नियुक्ति निवड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे कट्टर समर्थक विठ्ठलराव पाटील वानखेडे साखरेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी तर भाजपा शहराध्यक्षपदी अतुल खंदारे यांची काल झालेल्या राजस्थानी भवन येथील कार्यकर्ता बैठकीमध्ये निवड झाली . विठ्ठलराव वानखेडे यांनी तळागाळातील बहुजन समाजातील विद्याथ्यासाठी सामान्य शिक्षणापासुन वैद्यकीय शिक्षणा पर्यन्त तन मन धनाने सहकार्य केले तसेच गाव खेड्यातील शाळा याबद्दल त्यांचे विशेष आकर्षण असून त्यांना कुठलाही राजकीय वारसा नसून जेमतेम आर्थिक परिस्थितीतील अल्पभूधारक युवकांना भाजपाने एवढी मोठी संधी दिली,सामान्य लोकावर अन्याय होत असेल तर तो आपल्या छातीवर झेलण्याची सुद्धा कसब दाखविली आहे. भारतीय जनता पार्टीने या युवकाची सामाजिक कार्य पाहून भाजपाच्या च्या तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे . त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, आमदार किसन वानखेडे माजी आमदार नामदेव ससाणे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, अजय बेदरकर सर, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर,माजी तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते,पंचायत समिती प्रमुख एडवोकेट अनिल माने, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष बळवंतराव नाईक, श्रीधर पाटील देवसरकर, डॉ आनंदराव राणे, शिवाजी रावते दिनकरराव देशमुख, तसेच सर्व माझे गावकरी मंडळी
तसेच तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे .